• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

माता आसुबाई नवरात्र उत्सवात प्रदीप मुंडे यांच्या हस्ते सपत्नीक आसूदेवीची आरती संपन्न!

ByND NEWS INIDIA

Oct 1, 2022

गावातील तसेच पंचक्रोशीतील येणाऱ्या भाविक भक्तांना केले फराळाचे वाटप!

सर्वांना सुखी ,समाधानी ठेवण्याचे देवीला घातले साकडे!

ND NEWS |

परळी वैजनाथ मांडेखेल येथील रेणुका देवीचे आठवे पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता आसूबाई देवीची नवरात्र महोत्सवानिमित्त आरती नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ) यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या आई आणि गावच्या सरपंच सौ. शिवशल्या त्रिंबक मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच आसूदेवी गडावर भाविक भक्तांना फळाचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना सुखी समाधानी ठेवण्याचे देवीला त्यांनी साकडे घातले. मांडेखेल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात घटस्थापना संपन्न झाली. नवरात्र उत्सव कमिटीच्यावतीने आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. नऊ दिवस देवीच्या गडावर आराध्यांचे गाण्याचे कार्यक्रम संपन्न होतात. कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना फराळाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील युवकांच्यावतीने फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मंदिरावर गावातील तरुण तुळजापूरहून तुळजापूरच्या आईची अखंड ज्योत घेऊन येथील नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. नऊ दिवसांमध्ये गावात विविध आराधी मंडळाचे गीतांचे कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते असतात. देवीचे भक्त त्यांच्या वतीने नऊ दिवस गडावर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फळाची सोय केली जाते. यावेळी बालासाहेब घुगे,युवा नेते राहुल कराड(गुल्लू शेठ), दशरथ नागरगोजे, प्रा.संदिपान मुंडे, प्रणव मुंडे ,सुरेश नागरगोजे, दामोदर घुगे, किरण मुंडे, पवन मुंडे , नरहरी घुगे,अमोल मुंडे विलास कचले, अक्षय शिंदे, महेश नागरगोजे, सुरेश मुंडे, संभाजी भारती, प्रमोद मुंडे,राहुल मुंडे, गणेश नागरगोजे,सुधाकर नागरगोजे, शिवाजी नागरगोजे,कृष्णा नागरगोजे,आकाश नागरगोजे,भागवत नागरगोजे, आदीसह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक देवीचे भाविकभक्त उपस्थित होते.

गावातील तसेच पंचक्रोशीतील येणाऱ्या भाविक भक्तांना केले फराळाचे वाटप!

सर्वांना सुखी ,समाधानी ठेवण्याचे देवीला घातले साकडे!

नितीन ढाकणे | परळी वैजनाथ

मांडेखेल येथील रेणुका देवीचे आठवे पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता आसूबाई देवीची नवरात्र महोत्सवानिमित्त आरती नागापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ) यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या आई आणि गावच्या सरपंच सौ. शिवशल्या त्रिंबक मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाली तसेच आसूदेवी गडावर भाविक भक्तांना फळाचे वाटप करण्यात आले तसेच सर्वांना सुखी समाधानी ठेवण्याचे देवीला त्यांनी साकडे घातले.

मांडेखेल येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटात घटस्थापना संपन्न झाली. नवरात्र उत्सव कमिटीच्यावतीने आरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या हस्ते देवीची आरती संपन्न झाली. नऊ दिवस देवीच्या गडावर आराध्यांचे गाण्याचे कार्यक्रम संपन्न होतात. कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना फराळाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावातील युवकांच्यावतीने फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या मंदिरावर गावातील तरुण तुळजापूरहून तुळजापूरच्या आईची अखंड ज्योत घेऊन येथील नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. नऊ दिवसांमध्ये गावात विविध आराधी मंडळाचे गीतांचे कार्यक्रम घेतले जातात या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते असतात. देवीचे भक्त त्यांच्या वतीने नऊ दिवस गडावर येणाऱ्या भाविक भक्तांसाठी फळाची सोय केली जाते.

यावेळी बालासाहेब घुगे,युवा नेते राहुल कराड(गुल्लू शेठ), दशरथ नागरगोजे, प्रा.संदिपान मुंडे, प्रणव मुंडे ,सुरेश नागरगोजे, दामोदर घुगे, किरण मुंडे, पवन मुंडे , नरहरी घुगे,अमोल मुंडे विलास कचले, अक्षय शिंदे, महेश नागरगोजे, सुरेश मुंडे, संभाजी भारती, प्रमोद मुंडे,राहुल मुंडे, गणेश नागरगोजे,सुधाकर नागरगोजे, शिवाजी नागरगोजे,कृष्णा नागरगोजे,आकाश नागरगोजे,भागवत नागरगोजे, आदीसह गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक देवीचे भाविकभक्त उपस्थित होते.