• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे रविवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन

ByND NEWS INIDIA

Oct 1, 2022

हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या 6 कोटी रुपयांच्या कामाचे रविवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते बोधेगाव येथे भूमिपूजन

अर्थसंकल्पात धनंजय मुंडेंनी मिळवली होती मंजुरी

नितीन ढाकणे | परळी

सविस्तर वृत्त : परळी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या हिंगणी-आम्ला-कान्नापूर-बोधेगाव-सोनहीवरा या रस्त्याच्या कामाला रविवारपासून सुरुवात होत असून, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी सकाळी 9 वा. बोधेगाव येथे या कामाचे भूमिपूजन करुन शुभारंभ करण्यात येणार आहे.

आ. धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पातून 6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून, या कामाची निविदा प्रक्रिया व अन्य बाबी पूर्ण झाल्या आहेत.

ग्रामीण भागातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा हा रस्ता मानला जातो. हिंगणी, आम्ला, कान्नापूर, बोधेगाव, सोनहिवरा या गावांतून जाणाऱ्या या रस्त्याचे दुरुस्ती करून यांतर्गत काँक्रीट रुंदीकरण करण्यात येणार आहे.

रविवारी सकाळी 9 वा. बोधेगाव येथे या कामाचे भूमिपूजन आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात येणार असून, यावेळी पदाधिकारी व स्थानिक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.