• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महानिर्मितीचे अधिक्षक अभियंता लोणे सेवानिवृत्त!

महानिर्मितीचे अधिक्षक अभियंता लोणे सेवानिवृत्त!

लोणे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सदैव स्मरणात राहतील-मुख्य अभियंता मोहन आव्हाड

परळी

औष्णिक विद्युत केंद्र परळी येथील अधीक्षक अभियंता अनिल लोणे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने सेवापूर्ती कार्यक्रमात निरोप देण्यात आला. त्यांना दि ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. प्रशासकीय कार्यालयातील सभागृहात सेवापूर्ती कार्यक्रमात निरोप देण्यात आला. त्यांनी ३३ वर्ष सेवा बजावली.यावेळी मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते त्यांचा व त्यांच्या पत्नी महावितरणच्या सहायक अभियंता रेखा लोणे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांच्यावर बनवण्यात आलेली चित्रफीत दाखवून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी लोणे भावुक झाले होते.
अनिल लोने हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात समाजातील गरजूंना मदत करणे यांना मार्गदर्शन करणे व वेगवेगळे उपक्रम ते राबवतात.
या कार्यक्रमाला मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपमुख्य अभियंता दिनकर इंगळे, प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार, अधिक्षक अभियंता एस एन बुकत्तरे,कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ के एस तुपसगार, वरिष्ठ व्यवस्थापक अरविंद येरणे , कार्यकारी अभियंता मदन पवार, सतीश मुंडे, आर एस कांबळे ,बाबासाहेब वाघमारे, उद्धव नरवाडे साईनाथ रमोड , राहुल बनसोडे, मुलगी श्रुती लोणी, बंधू अनंता लोणी, डॉ. विजयकुमार माहूरकरआदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार दिलीप वंजारी यांनी मानले.