*हनुमाननगर-डोंगर तुकाई रस्त्याची दुरूस्ती करा-अभयकुमार ठक्कर*
*परळी/प्रतिनिधी*
हनुमाननगर ते डोंगर तुकाई रस्त्याची अवस्था मागील अनेक वर्षापासून खराब झालेली असून नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्वरीत रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे बीड जिल्हा उपप्रमुख अभयकुमार ठक्कर यांनी दिला आहे.
मुख्याधिकारी नगर परिषद परळी यांना दिलेल्या निवेदनात अभयकुमार ठक्कर यांनी म्हटले आहे की, लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत असून डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक ये जा करतात. या रस्त्यावर मोटार सायकल चालविणे सुद्धा अवघड असून पायी चालणार्या भाविकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. नगर परिषद प्रशासनाने या संदर्भात त्वरीत लक्ष घालून हनुमान नगर ते डोंगर तुकाई रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथाआम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, शिवसेनेचे शहर संघटक संजय कुकडे, किसन बुंदेले, मोहन परदेशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.