• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

जय माता दी..च्या गजरात वैष्णोदेवींची अखंड दिव्य ज्योत परळीत दाखल बियाणी परिवाराकडून ज्योतीचे भव्य-दिव्य स्वागत

ByND NEWS INIDIA

Sep 21, 2022

जय माता दी..च्या गजरात
वैष्णोदेवींची अखंड दिव्य ज्योत परळीत दाखल
बियाणी परिवाराकडून ज्योतीचे भव्य-दिव्य स्वागत

ND NEWS | परळी/ प्रतिनिधी-
नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठान आयोजित नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर थेट जम्मू-काश्मिरमधील वैष्णोदेवी मंदीरातून अखंड दिव्य ज्योत आणण्यात आली असून या ज्योतीचे स्वागत आज बियाणी परिवाराच्या वतीने गुरुकृपा नगर येथे करण्यात आले. जय माता दी…चा गजर, ढोल-ताशांचा निनाद, गुलालांची मुक्त उधळण करीत या अखंड दिव्य-ज्योतीचे स्वागत बियाणी परिवारातील सदस्यांनी केले.
आ. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान व राधा-मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने व न.प. गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रौत्सव-2022 चे मुख्य संयोजक चंदुलाल बियाणी यांच्या संयोजनाखाली होत आहे. दि. 26 सप्टेंबर ते 5 अॉक्टोबर  कालावधीत नवरात्रौत्सवानिमित्त साक्षात वैष्णोदेवींचे ज्योतीस्वरुप विशेष रथातून वैष्णोदेवी येथून आणण्यात आले आहे. आज या दिव्य-ज्योतीचे स्वागत परळी येथे करण्यात आले आहे. यावेळी संपादक सतिश बियाणी,राजेश मोदाणी, प्रकाश वर्मा, संजय शर्मा, बालासाहेब काळे यांनी आणलेल्या ज्योतीचे विधीवत स्वागत करण्यात आले. माजी नगराध्यक्षा राधाबाई बियाणी, मुख्य संपादक तथा संयोजक चंदुलाल बियाणी, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, अभयकुमार वाकेकर, विजय लड्डा, धिरज बाहेती, बंसल क्लासेसचे प्राचार्य डाॅ. आर.एस. बांगड, विष्णू घुगे, प्रा. कैलास घुगे, ठोंबरे,  सौ. कल्पना बियाणी, सौ. भारती बियाणी, बद्रीनारायण बाहेती, राकेश चांडक, जयप्रकाश बियाणी, राधेशाम झंवर, ओमप्रकाश बुरांडे, ह.भ.प. रामेश्वर महाराज कोकाटे, आनंद हडबे,  शिवसेना शहर प्रमुख राजेश विभुते, चंद्रप्रकाश काबरा, ओम मुंदडा , प्रशांत तोतला, सचिन स्वामी, राजस्थानी पतसंस्थेचे दिगंबर कागले, आनंत भाग्यवंत आदींनी अखंड दिव्य-ज्योतीचे स्वागत केले.

दहा दिवस दिव्य ज्योत दर्शनास उपलब्ध
नवरात्रौत्सवानिमित्त औद्योगीक वसाहत येथे साक्षात वैष्णोदेवींचा देखावा सादर करण्यात येत आहे.  यामध्ये पहाड, डोंगर-दऱ्या, बाणगंगा व भुयार असे जशास तसे स्वरुप ठेवण्यात आले आहे. जवळ-जवळ 1 किमी लांबीचा हा देखावा असून या देखाव्यातच भाविकांना साक्षात वैष्णोदेवी येथून आणलेली दिव्य-ज्योत व ज्योत स्वरुपात वैष्णोदेवीचे दर्शन घेता येणार आहे. नवरात्र कालावधीत ही ज्योत अखंडपणे तेवत राहणार असून भाविकांसाठी ती उपलब्ध राहील. तसेच दि. 26 सप्टेंबर रोजी अखंड दिव्य ज्योत शोभा यात्रेच्या माध्यमातून परळीच्या मुख्य रस्त्यावरुन मार्गक्रमण करील.