• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

रुग्ण मृत्यु प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करुन डॉ प्रमोद घुगे यांचे आयकॉन हॉस्पिटलची मान्यता रद्द करा

ByND NEWS INIDIA

Sep 22, 2022

रुग्ण मृत्यु प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करुन डॉ प्रमोद घुगे यांचे आयकॉन हॉस्पिटलची मान्यता रद्द करा*

रुग्ण हक्क संरक्षण समितीची मागणी

विकास राठोड: लातूर शहर प्रतिनिधी

लातुरः- लातुर शहरातील डॉ प्रमोद घुगे यांच्या आयकॉन हॉस्पिटल मध्ये संतोष लातुरे या रुग्ण मृत्यू प्रकरणाची चौकशी निपक्षपातीपणे करुन डॉक्टर विरुद्ध त्वरीत गुन्हा नोंद करावे व आयकॉन हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी या मागणीचे निवेदन रुग्ण हक्क संरक्षण समिती व रुग्णनातेवाईक आणि रुग्णहितचिंतकांचा वतीने लातुर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

लातुरः- तिन दिवसापुर्वी आयकॉन हॉस्पिटल मध्ये संतोष दिनकर लातुरे हा रुग्ण किडनिचा उपचार घेत असताना मयत झाला उपचारा दरम्यान रुग्णाला व रुग्ण नातेवाईकांना हॉस्पिटल प्रशासनाने अक्षम्य उद्धटबाजी केली, रुग्णाला लागणारे औषध इंजेक्शन हे सर्व आमच्या मेडिकल दुकानातुन नाही घेतले तर उपचार करणार नाही असे वारंवार सांगितले, दबाव तंत्र अवंलबविले, आयकॉन हॉस्पिटलचे मेडिकल रात्रि बंद असायचे यामुळे काही इंजेक्शन हे वेळेवर भेटले नाही, उपचार योग्य केला नाही, डॉक्टर हि वेळेवर नाही आले यामुळे रुग्ण दगावला असे रुग्णांचा नातेवाईकांनी आरोप करत शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार अर्ज दिला आहे . सदर रुग्ण मृत्यू प्रकरणाची निपक्षपातीपणे पारदर्शकपणे तपास व चौकशी होऊन डॉक्टर घुगे व आयकॉन हॉस्पिटवर गुन्हा नोंद करावा व तसेच या हॉस्पिटल मध्ये यापुर्वीही असे अनेक गैरप्रकार घडले आहेत सदर आयकॉन हॉस्पिटलने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टच्या नियम व नियमावलीची पुर्तता न करता हॉस्पिटल नोंदनी परवाना मिळवला आहे का? याची चौकशी करावी, सदर हॉस्पिटलमध्ये अॉपरेशन थिएटर, खाटाची संख्या, आय सि यु, नर्सिंग स्टाप यांची शैक्षणिक अहर्तता, अॉक्सिजन सुविधा, बायोमेडिकल वेस्ट निस्सारण व्यवस्था हे सर्व नियमाप्रमाणे नाही तसेच आग लागल्यावर अग्णिशमनची व्यवस्था सदर रुग्णालयात नाही. या सर्व बाबीची चौकशी करुन जर हे हॉस्पिटल कायादेशीर नियमाचे पालन करुन नोंदणीकृत केलेले नाही असे आढळले तर सदर आयकॉन हॉस्पिटलची मान्यता रद्द करावी अशि मागणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी लातुर यांना निवेदनाद्वारे केली व त्वरीत कारवाई नाही झाल्यास रुग्णहितार्थ तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला

यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समितीचे प्रमुख ॲड. निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ, महिला अध्यक्षा रेणुकाताई बोरा, मराठवाडा संघटक रवी बिजलवाड , युवती प्रमुख सुष्मिता बोरा, महिला जिल्हाध्यक्षा कावेरी विभुते, प्रा.शंकरराव सोनवणे, रुग्ण नातेवाईक जगन्नाथ कोळंबे, रमण लातुरे,ॲड,अजय कलशेट्टी, गोंविद केंद्रे, देवानंद गुजर, बसवेश्वर रेकूळगे,विपिन ढगे, राहुल जवळे, कल्याण लातुरे,स्वपनिल देबडवार,संकेत उटगे,आदी समिती पदाधिकारी रुग्ण नातेवाईक रुग्णहितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते