• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारुण पराभव करत जय किसान विकास पॅनलचे बोधेगाव कावळेवाडी सोसायटीवर वर्चस्व!*

ByND NEWS INIDIA

Sep 20, 2022

*राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारुण पराभव करत जय किसान विकास पॅनलचे बोधेगाव कावळेवाडी सोसायटीवर वर्चस्व!*

*सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी सर्जेराव आश्रुबा शिंदे तर व्हाईस चेअरमन पदी कौशल्याबाई रंगनाथ मकर यांची निवड!*

*निवडणुकीत अखेर सत्याचा विजय झाला; प्रा.टी.पी. मुंडे (सर )यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन ,व्हाईस चेअरमन आणि संचालकांचा सत्कार संपन्न!*

परळी वैजनाथ प्रतिनिधी

अतिशय प्रतिष्ठित केलेल्या तालुक्यातील बोधेगाव कावळेवाडी सोनहिरा सेवा सोसायटी ची निवड प्रक्रिया संपन्न झाली त्यात राष्ट्रवादीच्या पॅनलचा दारुण पराभव करत जय किसान विकास पॅनलचा विजय होऊन चेअरमनपदी सर्जेराव आश्रुबा शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी कौशल्याबाई रंगनाथ मकर यांची निवड करण्यात आली.

जय किसान विकास पॅनल भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे ,लोकनेते प्रा.टी.पी. मुंडे (सर) यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली होती त्यात 13 पैकी सात उमेदवार जय किसान विकास पॅनलचे निवडून आले होते. त्याची आज निवड प्रक्रिया संपन्न झाली.

लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित सोसायटीचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन तसेच संचालकांचा सत्कार संपन्न झाला. नवनिर्वाचित संचालकांमध्ये रुस्तुमराव गडदे,बालासाहेब शेळके, श्रीमंत रुपनर ,अन्नपूर्णाबाई थिटे, शारदाबाई शिंदे यांचा समावेश आहे या सर्व संचालकांचा शाल हार आणि पेढा भरवून नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नागापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) उपस्थित होते. निवडणुकीमध्ये अखेर सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया सत्कारादरम्यान लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे (सर) यांनी दिली.

बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. समोरील पॅनल निवडणूक प्रक्रियेवर आणि निवडणूक अधिकारी यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही अखेर सत्याचा विजय झाला .

पॅनल निवडून आणण्यासाठी पॅनल प्रमुख विनायकराव गडदे, रेशीम नाना कावळे, केशव खडके, बळीराम गडदे ,छत्रपती कावळे ,मुरलीधर गडदे, बाळासाहेब शिंदे ,जनाभाऊ धायगुडे ,साहेबराव गडदे, बाळासाहेब कुलकर्णी ,प्रदीप थिटे, रामलिंग गडदे ,हनुमंत रुपनर आणि सचिन शिंदे यांनी परिश्रम घेतले.