• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने येथे महानिर्मिती संच क्र.६ गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न 

ByND NEWS INIDIA

Sep 21, 2022

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने येथे महानिर्मिती संच क्र.६ गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन संपन्न

 

परळी प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने दि २० रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन महानिर्मिती संच क्र.६ गेटसमोर द्वारसभा आयोजित करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या मुख्य कार्यालय सबंधित सभासदांच्या समस्या व धोरणात्मक समस्या या बाबत मुख्य प्रशासनाची उदासीन आणि अन्यायकारक भूमिका असल्यामुळे संविधनिक मार्गाने आपल्या समस्या सोडविण्यासाठी करीता द्वारसभा व सदर मागण्या मान्य न केल्यास तिन्ही कंपनीच्या गेट समोर एकदिवसीय धरणे आंदोलन ११ आँक्टोबर २२ ला करन्यात येईल अशी माहिती द्वारसभेत देण्यात आली. द्वारसभेला संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष बी.एल वडमारे, संनघटनेचे सल्लागार महेंद्र शिंदे यांनी संबोधित केले. यावेळेस संघटनेचे जेष्ठ सभासद एस.एल होटकर, सरवदे बी एन, एस एस गायकवाड, जयवर्धन सूर्यवंशी,अशोक रोडे आकाश वाघ ,आशिष रत्नपारखी , विकास जाधव , कपिल कांबळे , मनोज शिरसाट, वसंत वाघमारे, प्रदीप चव्हाण , किशोर कुडमिथे संघरक्षित मस्के,वैभव गायकवाड , अब्दुल नईम ,प्रीतम हनुमंते उपस्थित होते. आभार शाखेचे सचिव भागवत देवकर यांनी केले .