• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रा. काँ.पक्षाची बीड येथे आढावा बैठक पदाधिकारी,कार्यकर्ते ,हितचिंतक यांनी उपस्थित रहावे – संगिता तुपसागर

ByND NEWS INIDIA

Sep 20, 2022

मा. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रा. काँ.पक्षाची बीड येथे आढावा बैठक
पदाधिकारी,कार्यकर्ते ,हितचिंतक यांनी उपस्थित रहावे – संगिता तुपसागर
परळी (प्रतिनिधी) दिनांक२१ सप्टेंबर २०२२ बुधवार रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रवादी भवन बीड येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा जयंतराव पाटील (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र) यांच्या उपस्थितीत पक्ष नोंदणी, संघटनात्मक बांधणी, पक्षाची पुढील दिशा व धोरणे ठरवण्यासाठी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व आमदार, युवक, युवती, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रा.काँ. महीला आघाडीच्या बीड जिल्हाध्यक्ष संगीताताई तुपसागर यांनी केले आहे.
येणाऱ्या काळात नगरपालिका, जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये पक्ष संघटनेचा वाढ- विस्तार बूथ लेवल पर्यंत पक्ष बांधणीच्या दृष्टीने चर्चा होणार असल्याने ही बैठक अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी तुपसागर यांनी सांगितले.