• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

कळमनेर रस्त्याची हालत खस्ता, गिट्टी उखडली रस्त्यावर खड्याचे साम्राज्य

ByND NEWS INIDIA

Sep 13, 2022

संबंधित विभागाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष.

यवतमाळ :✍🏻चेतन वर्मा

राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा कळमनेर या रस्त्यावरील मोठ्या प्रमाणात डांबर व गिट्टी उखडल्याने जागो जागी मोठं मोठे खड्डे पडले आहे. कळमनेर हे गाव गट ग्रामपंचायत असून राळेगाव तहसील येथून आठ ते दहा किमी अंतरावर असून कळमनेर येथील गावकऱ्यांना प्रत्येक कामाकरिता, शिक्षण, दवाखाने, ब्यांक, बाजार व इतर सर्वच गोष्टी करीता राळेगाव येथेच येजा करावे लागत असल्यामुळे येथील नागरिकांना व शाळकरी विध्यार्थ्यांना येजा करत असतांना सदर रस्त्याची अतिशय खराब व दयनीय अवस्था झालेली असल्यामुळे मोठी अडचण व नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष मनजे कळमनेर येथे महामंडळाची बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे शाळेकरी विध्यार्थी व सर्वच गावकरी लोकांना राळेगाव येथे जाण्याकरिता एक ते दीड किमी अंतर पायदळ चालत मेन रोड वर यावे लागते, रस्त्याने पायदळ चालत असतांना त्या वेळेस जर एखादी मोठी फोर व्हीलर गाडी आली तर खड्यात साचून असलेले अतिशय बेकार व घाण पाणी अंगावर उडून पूर्ण कपडे खराब होत असून आरोग्याला सुद्धा मोठा धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे ,अत्यंत्य खराब झालेल्या या रस्त्यापाई संपूर्ण गावकरी त्रस्त्र झालेले असून त्यांना मोठा मानस्थाप सहन करावा लागत आहे, मागील वर्षी सुद्धा याच रस्त्या बाबत बातमी प्रकाशित करून तसेच संबंधित विभागाला व लोकप्रतिनिधींना या रस्त्याबाबत माहिती सुद्धा देण्यात आली होती मात्र त्यांनी या रस्त्या कडे लक्ष न देता दुर्लक्षच केले आहे असे बोलल्या जात आहे, त्यामुळे आतातरी संबंधित विभागाने व लोकप्रतिनिधींनी कळमनेर या रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर हा रस्ता दूरस्थ करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने जोर धरू लागली आहे.