• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित जनावरांची तपासणी करावी— प्रदीप मुंडे

ByND NEWS INIDIA

Sep 10, 2022

शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घेण्याचे केले आवाहन!

ND NEWS| :

परळी वैजनाथ प्रतिनिधी

परळी तालुका व नागापूर जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये लंपी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून जनावरांचे लसीकरण करावे अशी मागणी नागापूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ) यांनी केली आहे तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.

  लंपी हा प्रामुख्याने जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. हा आजार त्वचेशी संबंधित आहे. या आजारामुळे जनावरांच्या शरीरावर गाठी येत आहेत त्यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत.

  नागापूर जिल्हा परिषद गटातील बोधेगाव आणि कावळेवाडी या गावांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे जनावरांच्या अंगावर गाठी येत आहेत तसेच या रोगाचा प्रादुर्भाव इतर गावांमध्ये सुद्धा पसरू शकतो. या रोगाचा योग्य वेळी उपचार होणे गरजेचे आहे त्यामुळे तालुक्यातील पशुवैद्यकीय तालुका अधिकारी यांनी त्वरित यावर लक्ष घालून गावोगावी जाऊन डॉक्टरांच्या साह्याने जनावरांची तपासणी आणि लसीकरण करून घ्यावे अशी मागणी त्यांनी केली तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची योग्य ती काळजी घ्यावी आणि त्वरित तपासणी व लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.