• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

प्रा.टी.पी.मुंडे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मैदानात; नागापूर सब स्टेशन मधील 33 के.व्ही.ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित!

ByND NEWS INIDIA

Sep 2, 2022

पंकजाताई मुंडे यांचे मानले आभार;शेतकरी एकजुटीचा विजय—प्रदीप मुंडे

परळी वैजनाथ प्रतिनिधी
लोकनेते प्रा.टी.पी.मुंडे (सर) नेहमी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे याचा पुन्हा प्रत्यय आला.नागापूर येथील सबस्टेशन मधील 33 के.व्ही ट्रांसफार्मर गेल्या दोन महिन्यापासून जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले त्या संदर्भात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागापूर गटाचे माजी जि.प.सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू सेठ) यांच्या नेतृत्वाखाली नागापूर सब स्टेशन समोर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. आंदोलन करताच महावितरणने नरमाईची भूमिका घेतली आणि अखेर ट्रांसफार्मर कार्यान्वित झाला. आंदोलनात मिळालेले यश म्हणजे केवळ शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे प्रतिपादन माजी जि.प. सदस्य प्रदीप भैय्या मुंडे (बबलू शेठ) यांनी केले तसेच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा ट्रांसफार्मर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार जि .प. सदस्य प्रदीप भैया मुंडे यांनी मानले.

विविध मागण्या संदर्भात मा. कार्यकारी अभियंता साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले त्यांच्यावतीने परळी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता मा. आभिजीत राठोड साहेब यांनी निवेदन स्वीकारले .निवेदनात पुढील मागण्याचा समावेश आहे.
१) ३ एच.पी.चे ट्रांसफार्मर हे जास्तीच्या लोड मुळे जळत असून त्याऐवजी ५ एच.पी.चे ट्रांसफार्मर त्वरित बसवावे.
२) नागापूर सब स्टेशन मधील 33 केव्ही ट्रांसफार्मर गेल्या दोन महिन्यापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे व व्यवस्थीत देखभाल न केल्यामुळे जळाला त्याला जबाबदार कोण याचे उत्तर द्या?
३) शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा देताच ट्रांसफार्मर कसा कार्यान्वित झाला व या अगोदर का झाला नाही याचे उत्तर द्या?
४) शेतकऱ्यांच्या शेती पिकासाठी सुमारे १० ते १२ तास वीज पुरवठा सुरळीत करावा.
५) शेतकऱ्यांचे नुकसान अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षपणामुळे होत आहे. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.
६) डी.पी.साठी लागणारे फ्युज, किटकॅट, वायर आणि इतर साहित्य शेतकऱ्यास मार्केट मधून खरेदी करावे लागते त्या साहित्याचा खर्च शेतकऱ्यांवर का? आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना लोकनेते प्रा. टी.पी. मुंडे सर यांनी संबोधित केले.ते म्हणाले की,
ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे पाण्याअभावी व विजेअभावी पिके सुकून जात आहेत. असे असताना सुद्धा महावितरण कार्यालयाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. यापुढे हलगर्जीपणा केल्यास अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी ज्येष्ठ नेते मारुती मुंडे गुरुजी , रेशीम नाना कावळे, विनायकराव गडदे ,अशोक आघाव ,बळीराम गडदे ,मोतीराम बापू सोळंके, छत्रपती कावळे ,संदिपान मुंडे, माणिक सलगर ,रावसाहेब देशमुख ,दामू अण्णा मुसळे,परमेश्वर सोळंके ,बालु मुसळे,माणिक बनसोडे,सायस मुसळे,विकास बनसोडे ,बाबा बनसोडे,नागेश स्वामी, सचिन गोरे, राहुल बनसोडे, लखन सोळंके, ऋषिकेश सोळंके, अंगद राख, चंद्रकांत मुंडे, मंगेश मुंडे, कृष्णा मुंडे, हनुमंत जाधव ,नाथराव जाधव, शहाणीक कराड, अंकुशराव राख, युवराज नानवटे, मोहन आघाव ,रामकिसन घाडगे, गोविंदा आघाव, कुडलिक मुंडे, आत्माराम मुंडे ,मोहन मुंडे, अनंत महाराज मुंडे ,चंद्रकांत मुंडे, पिंटू माने, गोपीनाथ मामा घाडगे, विष्णू हंगे, राजाभाऊ मुंडे, गोविंद मुंडे, संजय राठोड, दौलत ढाकणे, बंकटी ढाकणे, नाना ढाकणे, माणिक ढाकणे,मधुकर ढाकणे, भागवत सलगर , अच्युत उबाळे, सुंदरराव सलगर, श्रीकिसन सातभाई,संभाजी सात भाई, विष्णू सातभाई ,सचिन सातभाई, जगदीश पाळवदे, राजाभाऊ तांदळे,मोहन कदम, आत्माराम नागरगोजे, दत्तू मुंडे, धनंजय कावळे, भाऊराव गडदे, मुरली गडदे, बाळू काका शिंदे, प्रदीप थिटे, सचिन शिंदे,गडदे सर, हरिभाऊ मुंडे, बालासाहेब मुंडे, हरिभाऊ भोसले, श्रीमंत मुंडे, बालासाहेब दराडे,प्रशांत दराडे, बाळूमामा डोईफोडे, भागवत डोईफोडे, तुकाराम कुकडे, राम कावळे, अशोक घाटूळ, घाडगे ताई, माणिक भोसले, अशोक साळवे आदीसह नागपुर परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.