• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

ई-केवायसीबाबत शेतकऱ्यांनी गांभीर्यांने घेतले नसले तरी केंद्र सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे

 

ND NEWS I: पीएम किसान योजनेचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

जे नागरिक पात्र नाहीत ते देखील योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास येताच संपूर्ण देशात ई-केवायसी करण्याची अट घालण्यात आली आहे. मार्च 2022 पासून आजपर्यंत चार वेळा हा मुदतवाढ झालेली आहे.

‘ई-केवायसी’ बाबत शेतकऱ्यांनी गांभीर्यांने घेतले नसले तरी केंद्र सरकारने कायम शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली होती. त्यामुळे 31 ऑगस्टनंतर पुन्हा मुदतवाढ मिळणार की नाही याबाबत साशंका होती. मात्र, यावेळीही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला आहे. कारण ई-केवयसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल एक महिना मिळाला आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महिन्याची मुदतवाढ केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग न नोंदवल्यामुळे पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा लागणार आहे.

पीएम किसान योजनेचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मार्च 2022 पासून आजपर्यंत चार वेळा हा मुदतवाढ झालेली आहे. त्यामुळे आता तरी शेतकरी या वाढीव मुदतीचा फायदा घेणार की नाहीत, हेच पहावे लागणार आहे. ही प्रक्रिया सीएससी केंद्रावर किंवा स्वत: शेतकऱ्याला देखील करता येणार आहे.

आता जनजागृती शिवाय पर्याय नाही

आतापर्यंत तीनवेळा ई-केवायसीसाठी मुदत देण्यात आली पण शेतकऱ्यांनी मात्र, सहभाग नोंदवलेला नाही. त्यामुळे आता कृषी आणि महसूल विभागाने याबाबत जनजागृती करुन आणि गावोगावी शिबीरे घेऊन ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करणे गरजेचे आहे.