• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

800 कंत्राटी चालकांना धक्का: आजपासून सेवा बंद

ByND NEWS INIDIA

Sep 3, 2022

ND NEWS |
एसटी महामंडळातील 800 चालकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. शनिवारपासून कंत्राटी चालकांची सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. चालकांचा वापर कमी होत असल्याचे कारण महामंडळाकडून देण्यात आले आहे. एप्रिलमध्ये संप मिटल्यावर कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले. यावेळी कंत्राटी चालकांना मुदतवाढ देण्यात आलेली होती. सध्या महामंडळात कंत्राटी चालकांचा वापर होत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील दोन वर्षात एसटीची सेवा कोरोनाच्या प्रसारामुळे पूर्णतः बंद होती. यावेळी मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवण्याचे एसटीला सरकारने आदेश दिले होते. याच काळात खासगी संस्थांना कंत्राटी चालक नियुक्तीचे आदेश एसटी महामंडळाने दिले होते.
विभाग नियंत्रकांना आदेश