• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मानकी येथे बैल पोळा शांततेत साजरा

ByND NEWS INIDIA

Aug 26, 2022

मानकी येथे बैल पोळा शांततेत साजरा

*मानकी येथे बैल पोळा शांततेत साजरा*

वणी शहर प्रतिनीधी:-विशाल ठोंबरे

तालुक्यातील मौजा माणकी येथे वृषभ राजाचा सण पोळा शुक्रवारी दि.२६ ऑगस्ट ला उत्साहात साजरा करण्यात आला.
पीक परिस्थती फारशी समाधानकारक नसतांना शेतक-यांनी शेतात राब-राब राबणारा तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या वृषभराजाचा पोळा सण उत्साहात साजरा केला.
गावातील शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना विविध रंगीबेरंगी झुला टाकुन, बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देऊन सजवून पोळ्यात घेऊन आले होते. परंपरागत गुढ्या पोळ्यात आणण्यात आल्या होत्या. येथिल पोलिस पाटील सौ. मिनाक्षी मिलमीले यांच्या हस्ते सर्वप्रथम मानाचा बैलाची पूजा करण्यात आली. यावेळी सरपंच कैलास पिपराडे, उपसरंपच शंकर माहुरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष परशुराम पोटे, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, प्रमोद वासेकर, उमेश सावरकर, नानाजी पारखी, माजी पोलीस पाटील चरण पुरी, महादेवराव चिडे, नितीन वासेकर, विकास चिडे, शंकर वासेकर, उमेश मोहुर्ले यांच्यासह गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.