• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे वृत्त विविध दैनिकात प्रकाशित होताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ऍक्शन मोड मध्ये आले असून अवैध हातभट्टी निमिर्ती करणाऱ्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून हजारो रुपयांची हात भट्टी दारू नष्ट केली.

ByND NEWS INIDIA

Aug 27, 2022
  • ND NEWS : परळी शहरात अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे वृत्त विविध दैनिकात प्रकाशित होताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ऍक्शन मोड मध्ये आले असून अवैध हातभट्टी निमिर्ती करणाऱ्या अड्ड्यावर शहर पोलिसांनी धाड टाकून हजारो रुपयांची हात भट्टी दारू नष्ट केली

परळी शहराजवळ असलेल्या व शहर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या वडसावित्री भागात अवैध रित्या हातभट्टी दारू बनविण्यात येत असल्याचा गोपनीय माहिती वरून शहर पोलीस ठाण्याचे सपोनि गोसावी व त्यांच्या पथकाने वडसावित्री भागात शनिवार दि 27 रोजी सकाळी धाड टाकून या ठिकाणी शेकडो लिटर हात भट्टीची दारू, त्यासाठी लागणारे साहित्य योग्य ते सॅम्पल घेऊन जागीच नष्ट केले.शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू निर्मिती करणाऱ्यात भीती निर्माण झाली आहे.