• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर दिल्लीलापण आपण धडक देऊ.: वसंत मोरे

ByND NEWS INIDIA

Aug 22, 2022

बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर दिल्लीलापण आपण धडक देऊ..मराठ्याच्या जात आहे मागे पुढे पाहणार नाही

 राज ठाकरेंच्या आदेशानंतर वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट 

 ND NEWS : राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुशगांने आता मनसेही पूर्ण तयारीनीशी मैदानात उतरणार असल्याचे चित्र आहे. पक्ष संघटनेसाठी  राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली अन् पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असेच चित्र आहे. शिवाय लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष निरीक्षकांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामतीच्या पक्ष निरीक्षकपदी पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांची निवड करण्यात आली. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्यानंतर त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टची सध्या सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्यावर बारामती लोकसभा मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. यावरुन बारामतीच काय साहेबांनी सांगितले तर दिल्लीलापण आपण धडक देऊ.