• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

50 खोके एकदम ओके,,,,,,गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो

ByND NEWS INIDIA

Aug 17, 2022

ND NEWS : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला महाविकास आघाडीतर्फे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक आंदोलन करण्यात आलं. 50 खोके, एकदम ओक्के सरकारचा धिक्कार असो. गद्दारांच्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
विधान भवनात पोहोचलेल्या गिरीश महाजनांनी यावर प्रतिक्रिया दिली. आंदोलन आणि घोषणाबाजी करणारे सगळे सध्या चौकशीच्या फेऱ्यांमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी ते अशा प्रकारे घोषणाबाजी करत असल्याचं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय