• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अँड.मनोज संकाये मित्र मंडळाच्या वतीने कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत हरिपाठ आणि अल्पोपहार वाटप करून राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती साजरी!

ByND NEWS INIDIA

Aug 16, 2022

अनाथांची सेवा करण्याचा मूलमंत्र भगवान बाबांनी दिला-अँड.मनोज संकाये

परळी वैजनाथ प्रतिनिधी

ND NEWS  : मराठवाडा ही संतांची भूमी आहे असे ओळखले जाते या मराठवाड्याच्या कुशीत अनेक महान संतांनी जन्म घेतला त्यापैकीच राष्ट्रसंत आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा हे एक त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून परळी येथील शंकर-पार्वती नगर येथील कन्हैया आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेत भगवान बाबा यांची जयंती तेथील वारकरी धर्माचे शिक्षण घेणाऱ्या मुलांना हरिपाठ आणि अल्पोपहार देऊन मोठ्या थाटात साजरी करण्यात आली.

 

ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि आरती गाऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि बाबांना अभिवादन करण्यात आले. अनाथांची सेवा करणे हा मूलमंत्र संत भगवान बाबांनी आपल्या सर्वांना दिला आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्तेअँड.मनोज संकाये यांनी केले.

हरिपाठ ग्रंथ हा जीवनाला दिशा देणारा आकाराने छोटासा असणारा परंतु महान असा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी दिला त्यातील एक अभंगाचे अनुसरण मनुष्याने केल्यास त्याला मोक्ष प्राप्त होतो असा ग्रंथ आहे.

यावेळी कन्हैया आध्यात्मिकवारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज मुंडे, उपाध्यक्ष ह.भ.प. वृक्षराज महाराज आंधळे, यांच्यासह मकरंद नरवणे ,शिवा बडे ,काशिनाथ सरवदे ,बालू गुट्टे, राहुल काळे ,रमेश संकाये, संतोष कांबळे ,सुंदर आव्हाड ,प्रवीण रोडे, परमेश्वर मुंडे, मुन्ना चव्हाण आदी सह वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षक मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.