• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन.

ByND NEWS INIDIA

Aug 14, 2022

 

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं निधन

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete Passed Away) यांचं निधन झालं आहे. आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात झालाय.  मराठा समन्वय समितीची आज दुपारी बैठक होती. त्यासाठी ते मुंबईकडे येत होते. पण मुंबईत पोहोचण्याआधीच त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. विनायक मेटे (Vinayak Mete) म्हणजे आंदोलनांचा बुलंद आवाज… सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारत सळो की पळो करून सोडणारे विनायक मेटे… मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून रस्त्यावर उतरत आंदोलन करणारे विनायक मेटे… मराठा समाजाच्या आंदोलनांचा चेहरा. अश्या या नेत्याच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळलाय…