• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत साकारलेय राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ

ByND NEWS INIDIA

Aug 12, 2022
  • धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून परळीत साकारलेय राष्ट्रभक्तीचे स्फूर्तीस्थळ

150 फूट उंचीच्या अतिविशाल तिरंगा ध्वजाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व खा. डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार लोकार्पण

परळी (दि. 11) – माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगर परिषदेच्या माध्यमातून परळी शहरातील वैद्यनाथ कॉलेजवरील डोंगरावर अतिविशाल तिरंगा ध्वजाच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे स्फूर्तिस्थळ साकारले असून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या स्फूर्तीस्थळाचे लोकार्पण आज संपन्न होणार आहे.

तब्बल 150 फूट उंची असलेल्या अतिविशाल तिरंगा ध्वजाची उभारणी करण्यात आली असून, यासह एल इ डी स्पॉट लाईट, जनरेटर, सीसीटीव्ही, सेफ्टी वॉल कंपाउंड तसेच सुशोभीकरण करून सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. या विशाल तिरंगा ध्वजाचे आज दि.13 ऑगस्ट रोजी सकाळी 10. 30 वा. माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे यांच्यासह बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

मराठवाड्यात सर्वात उंच असणारा हा विशाल तिरंगा ध्वज व सुशोभीकरण सुमारे 82 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आले आहे. वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या उंच डोंगरावर हा तिरंगा ध्वज डौलाने फडकल्यानंतर दूर अंतरावरून हा ध्वज लक्ष वेधून घेणार आहे.

या ध्वजासह सेल्फी पॉईंटचे शनिवारी (दि. 13) सकाळी 10.30 वा. लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार असून, या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक सुंदर बोंदर यांनी केले आहे.