• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

डॉ. जाकीर हुसेन उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांची ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती रॅली

ByND NEWS INIDIA

Aug 11, 2022

 

आज दि:11:08:2022 रोजी परळी येथील डॉ. झाकीर हुसेन एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळे तर्फे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘अंतर्गत विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात आली. भारत देश यावर्षी स्वातंत्र्याचा ७५ वा महोत्सव साजरा करणार असून परळी शहरातील व बीड जिल्ह्यातील ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमध्ये सहभागी होण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजुद्दीन मुल्ला यांनी केलं आहे.
याच अनुषंगाने शाळेने परळी शहरातील नागरिकांची जनजागृती करण्याच्या हेतूने, विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजित केली. या प्रभातफेरीची सुरुवात आयशा कॉलनी, मोहम्मदया कॉलनी, बंगला, जामा मस्जिद, आंबे बेस, तळ आणि टॉवर, टॉवर पशी संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजेद्दीन मूल्ला, उप तहसीलदार रुपनर साहेब, पी. आय.ठाकूर साहब, शिंदे साहेब पेशकार,महादेव इट के, अश्विन मोगरकर आदींची उपस्थित होती मान्यवरां चे संस्थेचे अध्यक्ष हाजी वाहजेद्दीन मुल्ला यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.