• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केबीसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करणारी बिहारमधील टोळी गजाआड, बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई

ByDeepak Gitte

Apr 8, 2022

 प्रतिनिधी:- दिपक गित्ते

 बीड, दि. 8 : केबीसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक करून लाखो रुपयांना लुटणारी टोळी बीड पोलिसांनी जेरबंद केल्याने अनेकांची पुढे होणारी फसवणूक थांबली आहे. या टोळीला बीडच्या सायबर पोलिसांनी गजाआड केले आहे.

          दि. 11 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात व्यक्तीने फिर्यादीचा मोबाईल केबीसी ग्रुपमध्ये समाविष्ट करुन त्यांना केबीसी ग्रुप मधुन मोबाईलद्वारे व्हीडोओ व ऑडिओ संदेश केला की, तुम्हाला 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे व चारचाकी गाडी बक्षीस म्हणुन मिळणार आहेत असे अमिष दाखवून त्यांच्याकडुन जीएसटी आणि टॅक्स या करीता वेळोवेळी पैशाची मागणी करुन वेगवेगळे मोबाईल क्रंमाकावरुन तसेच वेगवेगळे बँकेचे अकांउंट क्र. देवुन त्यावर पैसे भरण्यास सांगुन 29,23,000/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, वगैरे तक्रारीवरुन दि. 3 मार्च 2022 रोजी पोलीस स्टेशन बीड शहर येथे गु.र.नं. 40/2022 कलम 419, 420, 464,468,469,471,34 ऑफ आपीसी आर/डब्ल्यू 66 (एA), 66 (सी), 66(डी) ऑफ आटी अ‍ॅक्टनुसार अज्ञात आरोपीताविरुध्द गुन्हा करण्यात आला होता. मा. पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशान्वये सदरचा गुन्हा सायबर पोलीस स्टेशन, बीड येथे वर्ग करण्यात आलेला होता. गुन्हयाचा तपास करणे अत्यंत गुंतागुंतीचे होते. सायबर पोलीस स्टेशन, बीड येथील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदारांनी तांत्रीक पध्दतीने अहोरात्र मेहनत घेऊन गुन्ह्यातील आरोपींना 30 दिवसात निष्पन्न केले. यामध्ये साहील रंजन भिक्षुककुमार (वय 21 रा. पुर्व इंदिरानगर, रोड नं. 4 कनकरबाग सम्पतचकलोहीयानगर, पटना, राज्य बिहार), संतोषकुमार सिध्देश्वरकुमार शर्मा (वय 21 वर्ष रा. पीसी548 विद्यापुरी कंकरबाग सम्पतचक, पटना राज्य बिहार), अमनराज राजकुमार (वय 21 वर्ष रा. पुर्व इंदिरानगर पोस्ट लोहीयानगर, रोडनं. 4 कंकरबाग पटना, राज्य बिहार), अतुलकुमार गौतमकुमार सिन्हा (वय 20 वर्ष रा. आंबेडकरचौक हनुमाननगर कंकरबाग पटना, बिहार) या आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुली दिली आहे. वरील आरोपीकडुन हार्डडिस्क, वायफाय मोडेम पाच मोबाईल, फिंगरप्रिंट स्कॅनर, इत्यादी साहीत्य जप्त करुन आरोपींना दि. 2 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली. सदर आरोपींना मा. न्यायालय, बीड येथे रिमांडसह हजर केले असता, मा. न्यायालयाने 08 (आठ) दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. वरील आरोपीची चौकशी चालु असुन आणखी आरोपी निष्पन्न होण्याची दाट शक्यता आहे. तसेच गुन्ह्यातील फसवणूक झालेली रकमेचा तांत्रीक पध्दतीने शोध घेणे सुरु आहे. सदर कामगीरी पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पो. उपनि जाधव, पो.ह. जायभाये, पो.ना. आसेफ शेख, अनिल डोंगरे, विजय घोडके, अन्वर शेख, बप्पासाहेब दराडे, पंचम वडमारे, संतोष म्हेत्रे, प्रदिपकुमार वायभट व महीला पोलीस अंमलदार शुभांगी खरात सर्व सायबर पोलीस स्टेशन बीड यांनी केली आहे.