• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड जिल्ह्यातील 52 रुग्णवाहिकांचे सोमवारी वितरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांचे आवाहन

ByND NEWS INIDIA

Sep 26, 2021

 

केज प्रतिनिधी : हनुमंत गव्हाणे

जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी वेळेत रुग्णालयात जाता यावे, यासाठी आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी, यासाठी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती बजरंग सोनवणे यांनी पाठपुरावा केल्याने 52 रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस ग्राऊंड, नगर रोड, बीड येथे ना.धनंजय मुंडे, पालकमंत्री बीड यांच्या हस्ते तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा, सौ. शिवकन्या सिरसट यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष, श्री. बजरंग सोनवणे तसेच जिल्हा परिषदेतील सर्व सभापती यांच्या प्रमूख उपस्थितीत 52 रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

बीड जिल्ह्याच्या प्रा.आ.केंद्रातील आरोग्य सेवा उंचावण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्याच्या हेतूने बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी ना. राजेश टोपे, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांना दि. 10 फेब्रुवारी 2021 रोजी निवेदनाद्वारे बीड जिल्ह्यातील 52 प्रा.आ.केंद्रांना प्रत्येकी 1 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. आरोग्य विभागाने बीड जिल्ह्यातील 52 प्रा.आ.केंद्रासाठी प्रत्येकी 1 प्रमाणे 52 रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. यासाठी बजरंग सोनवणे, यांनी मा.ना.धनंजय मुंडे, पालकमंत्री यांच्या मदतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन आरोग्य मंत्र्यांच्या सकारात्मक पुढाकाराने बीड जिल्ह्यासाठी 52 रुग्णवाहिका मंजूर करुन घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यासाठी 52 रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत.याबद्दल बीड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. 52 रुग्णवाहिकांचे वाटप कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले आहे.