• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी चिखल तुडवत बजरंग सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर

ByND NEWS INIDIA

Sep 26, 2021

 

केज प्रतिनिधी :हनुमंत गव्हाणे

 

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हादगाव,डोका,लाखा,कानडीबदन गावात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात स्वत: पाहणी केली.

केज तालुक्यातील अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अनेकांची पिके पाण्यात गेली आहेत तर काढणीला आलेले सोयाबीन पुर्णतः पाण्यात गेल्याने नुकसान झालेले असून जमिनीचे हि नुकसान झालेले आहे,त्यामुळे रब्बी पिक घेण्यासाठी ही अडचणी होणार आहेत. त्यामुळे नुकसानीची माहिती घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केज तालुक्यातील हादगाव, डोका,लाखा,कानडीबदन या गावांना भेटी दिल्या .या वेळी शेतक-यांशी संवाद साधताना बजरंग सोनवणे म्हणाले की, शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्या बाबत नुकसान भरपाई मिळावी म्हणून सरकारकडे मागणी करणार असल्याची माहिती दिली. यावेळी हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफभाई सय्यद, अजीज कच्छी,भारत घाडगे, संजय तोडकर,शहाजी खंडाळे, राजाभाऊ जगदाळे, गणेश सावंत उपस्थित होते.