• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा होणार कायापालट ; रस्त्याच्या दुरुस्तीला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी

ByDeepak Gitte

Sep 2, 2021

खा.प्रितमताई मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीडकरांना मिळणार दर्जेदार रस्ता

प्रतिनिधी- दिपक गित्ते

ND NEWS LIVE | बीड । दि.०२ ।
बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ एफ या रस्त्याच्या दुरुस्तीला केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.रस्ते विकास मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन योजना २०२१-२२ मध्ये रस्त्याच्या दुरुस्तीचा समावेश करण्यात आला असून लवकरच याकामी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

बीड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेला राष्ट्रीय महामार्ग ३६१ एफ बीड शहरातून जातो,रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शहरातील नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.गतवर्षी सप्टेंबर
मध्ये खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती.केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देत वार्षिक योजनेत समावेश केल्यामुळे खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीला यश आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीच्या कामाचा मंत्रालयाच्या वार्षिक बजेट योजनेत समावेश झाल्यामुळे दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या निधीला लवकरच मंजुरी मिळणार आहे.जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने बीड शहरातील नागरीकांची अडचण सोडवली असून त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरीकांना दर्जेदार रस्ता आणि सुलभ वाहतूक व्यवस्था मिळणार आहे.