• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

 

              आज दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रविवार रोजी केज तालुक्यातील  वडमाउली  दहिफळ  येथे मानव हित लोकशाही पक्षाच्या  वतीने  आयोजित  केलेल्या  कार्यक्रमात कल्याणराव बाबर यांची केज तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

     मानवहित लोकशाही पक्ष हा अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजामधील  जे ” मागासलेले घटक” आहेत त्यांचा आर्थिक राजकीय आणि शैक्षणिक विकास झाला पाहिजे आणि” वंचित घटक “आहेत ते राजकीय दखल पात्र झाले पाहिजेत कुठल्याही गोष्टीमध्ये मागास राहिला नाही पाहिजे शिव लहुजी फुले-शाहू-आंबेडकर-अण्णाभाऊ यांची चळवळ घराघरांत पोचली पाहिजे यासाठी  मानव  हित  लोकशाही  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ  साठे  यांच्या  आदेशानुसार  कल्याणराव  बाबर  यांच्या सामाजिक  कार्याची  दखल घेऊन मानवहित लोकशाही पक्षाचे केज तालुका अध्यक्ष अनिल गालफाडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.