• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*नाव्होली येथे कै.महादेव बिक्कड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निम्मीत्त ह.भ. प. श्री. भागवत भुषण केशव महाराज शात्री यांचे किर्तन संपन्न.*

ByND NEWS INIDIA

Aug 23, 2021

 

===============================

केज प्रतिनिधी – हनुमंत गव्हाणे

कोरोना काळात अनेकांना या जगाचा निरोप घ्यावा लागला होता. त्यात कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता हि ईश्वरी घटना घडत होती. यातच दयाळू स्वभावाचे कै.महादेव बिक्कड यांचे कोरोना मुळे निधन झाले होते. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचे प्रथम पुण्यस्मरण संप्पन्न झाले.

काळाने जरी हिरावली,अनंत तुमची छाया । नित्ये स्मरते आम्हाअनंत तुमची माया ।।
मनी होता भोळेपणा । कधीच दाखवला मोठेपणा ।।
अजुनही होतो भास । तुम्ही आहात जवळपास । शांती लाभो तुमच्या आत्म्यास ।
हिच विचार नंतु विनंती आमची परमेश्वरास ।।
अशा भावनिक विचार वाक्याने सर्वांना आश्रु ढाळायला लावले.
केज तालुक्यातील मौजे नाव्होली येथील कै.महादेव तात्याबा बिक्कड हे अंबाजोगाई सह.साखर कारखाना येथे नौकरी करून सेवानिवृत्त झाले. व गावावर यांच्या येवून ऊत्तम शेती म्हणून शेती करत आहेत असताना त्यांचे कुटुंब अंबाजोगाई येथे असल्याने त्यांना येजा करावे लागत होते. याच दरम्यान त्यांना कोरोना आजाराने झडप घातली व त्यातून ते सावरले नाहीत अखेर त्यांची दि.४ ऑगस्ट २०२० रोजी प्राणज्योत मालवली. पहाता पहाता आज त्यांना एक वर्षाचा काळ निघून गेला. त्यामुळे कै.महादेव तात्याबा बिक्कड यांचे प्रथम पुण्यस्मरण नाव्होली या त्यांच्या गावी मिती श्रावण कृष्ण पक्ष व प्रतिपदा १ शके १९४३ सोमवार दि.२३ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११ ते १ हभप श्री. भागवत भुषण केशव महाराज शास्त्री (भगवान श्रीकृष्ण आश्रम ,केज ) यांचे किर्तन संपन्न झाले. कै. महादेव बिक्कड यांच्या जिवनाबद्दल महाराजांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. व त्यांच्या या भावनिक किर्तनाने श्रोते व आप्तेष्ट भावनिक होवुन आश्रु ढाळत होते.
या किर्तनासाठी महाराजांना साथ देण्यासाठी गायनाचार्य नामदेव महाराज क्षिरसागर , नारायण महाराज आरणगावकर, सुदाम महाराज बिक्कड ,डोईफडे महाराज , पेटीवादक अरूण महाराज देशमुख ,भास्कर सर, वादनाचार्य बंडु महाराजमेटे यांचे सहकार्य लाभले. कै.महादेव तात्याबा बिक्कड यांच्या पश्चात पत्नी श्रीमती. कमलताई , मुले अनंत , सुनील तर मुलगी मणिषा नातवंडे तसेच मोठे भाऊ त्रिंबक व सुंदर यांचे सह कोंडीराम , रामभाऊ व पुतने असा फार मोठा परिवार असुन आज एक वर्ष पुर्ण झाले तरी दु:खाची तिव्रता तितकीच आजही पहावयास मिळाली.