• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

अजहर खान:परळी वैजनाथ, प्रतिनिधी…

        राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवाधर्म” हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले.

       राष्ट्रवादी वकील संघ व सेवाधर्म टीमच्या वतीने परळी वकील संघास 60 जलनेतीपात्र भेट देण्यात आले. यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड .पी एम सातभाई यांच्या हस्ते “जलनेती पात्र” वकील बांधवाना भेट देण्यात आले. या छोटेखानी कार्यक्रमास ॲड . डी पी कडभाने,ॲड .डी एल उजगरे,राष्ट्रवादी वकील संघाचे शहर अध्यक्ष ॲड . मनजीत सुगरे, ॲड .गिराम ,ॲड .बाळासाहेब मुंडे, ॲड .दस्तगिर,ॲड .एजाज , ॲड .उरुज आदी वकील बांधव उपस्थित होते.

                “जल’ म्हणजे “पाणी” आणि “नेती” म्हणजे ‘स्वच्छता”.प्राचीन काळापासून योगसाधना करण्यापूर्वी जलनेती करण्याची शास्त्रोक्त पद्धती आहे.आजच्या काळात या पद्धतीचा अवलंब केल्याने अनेकांना याचे फायदे झालेले आपण सर्वांनी प्रसारमाध्यमातून बघितले आहे.कोरोनाचा विषाणू श्वसन मार्गाने प्रवेश करतो आणि सर्वप्रथम आपला संचय हा नाकपुड्या मागील खाचात करतो. आयटीपीसीआर चाचणी मध्ये याच खाचेतून सॅम्पल घेतले जाते.आपल्याला या जलनेतीद्वारा नाकपुड्याद्वारे याच खाचा स्वच्छ ठेवता येतात,कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाही केवळ यासाठी स्वच्छ पाणी घेतले पाहिजे. सर्वांना उपयुक्त ठरणारे जलनेती पात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वितरीत करण्यात येत आहेत.याचा मोठ्या प्रमाणावर लाभ नागरीकांना होणार आहे.