• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

१ मे रोजी अट्टल महाविद्यालयाकडून महाराष्ट्र व कामगार दिनाचे आयोजन

ByND NEWS INIDIA

Apr 30, 2021

गेवराई प्रतिनिधी: सुशील टकले 

ND NEWS:  मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, र.भ.अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई, जि. बीड येथील मराठी विभागाच्या वतीने १ मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त  शनिवार, दि. १ मे २०२१ रोजी सकाळी ११ वाजता फेसबुक पेजवरून लाईव्ह

व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.भारतीय श्रमसंस्कृती, कामगार चळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरया विषयावर डॉ. वैजनाथ अनमुलवाड (सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, आदिवासी बोली व मौखिक परंपरा जतन समिती अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य) हे संवाद साधणार आहेत.

प्राचार्य डॉ.रजनी शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह सहभागी होण्याचे आवाहन मराठी विभाग प्रमुख डॉ.संदीप बनसोडे, समाधान इंगळे, शरद सदाफुले यांनी केले आहे.