• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

लेखक अजयकुमार गंडले यांच्या ग्रंथाचे डॉ.आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात वाचन सुरू

लेखक अजयकुमार गंडले यांच्या ग्रंथाचे डॉ.आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात वाचन सुरू

परळी प्रतिनिधी.

प्रसिद्ध लेखक तथा विचारवंत अजयकुमार गंडले यांचे नवराष्ट्र निर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचा विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील हातगाव येथील बुद्ध विहारात सामुदायिक वाचन करण्यात येत आहे .परळीतील लेखकाचा हा सन्मान होत असल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.
‌. याविषयी अधिक माहिती अशी की ,नवराष्ट्र निर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे अजयकुमार गंडले यांचे पुस्तक आहे .डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर या पुस्तकात अजयकुमार गंडले यांनी सखोल स्वरूपात मांडणी केली आहे .लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते .अजयकुमार गंडले हे जसे लेखक आहेत तसे प्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत .
त्यांच्या या नवराष्ट्र निर्माते डॉ .बाबासाहेब आंबेडकर या पुस्तकाचे सामूहिक वाचन माता रमाई बुद्ध विहार ,मौजा हातगाव, तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येते दिनांक 1 एप्रिल पासून चालू करण्यात आले आहे .रोज सायंकाळी या ग्रंथ वाचनात सुरुवात करण्यात येते .या ग्रंथाचे वाचन वसंतराव मोहोड,(शेन्दरी) तसेच हरिकिशन बेलखेडे डोलारी (शेंन्दरी) , हे करीत आहेत .मागील दहा दिवसापासून नियमितपणे ग्रंथ वाचन सुरू आहे. 14 एप्रिल रोजी या ग्रंथ वाचनाचा समारोप करण्यात येणार आहे .
या ग्रंथ वाचनास ग्रामपंचायत सदस्य दीपक अधने ,प्रमोदभाउ अधने ,भीमराव धवने, ज्ञानेश्वरी धवने, विठ्ठलराव धवने, देविदास धवने,ललीत धवने,युवक मंडळ आणि हातगाव येथील माता भीमाई चॅरिटेबल ट्रस्टच्या महिला उपस्थित होत्या.