• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

पान टपरीत स्फोट; टपरी चालक जखमी स्फोट कशाचा ?

पान टपरीत स्फोट; टपरी चालक जखमी
स्फोट कशाचा ?

अंबाजोगाई — बातमीपत्र

सोमवारी रात्री एका पानटपरीत स्फोट झाल्याने टपरी चालक जखमी झाल्याची घटना जवळगाव येथे सोमवारी रात्री घडली. पोलीस स्फोटाच्या कारणाचा पोलीस घेत आहेत. दरम्यान मंगळवारी पोलीस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट दिली अशी माहिती मिळत आहे

जवळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अशोक सुभाष भालेराव 32 वर्ष यांची पानटपरी आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास टपरीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात टपरीचे वरचे पत्रे उडून गेले. तर जमिनीत मोठा खड्डा पडला. यात टपरी चालक अशोक भालेराव हा जखमी झाला अशी ही चर्चा आहे. त्याला उपचारासाठी अंबाजोगाई येथील एस आर टी रुग्णालयात दाखल केले आहे.स्फोटात टपरीचे जवळपास 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. स्फोटाचा आवाज मोठा झाल्याने या ठिकाणी परिसरातील ग्रामस्थ जमा झाले. दरम्यान, टपरीच्या पाठीमागे असलेल्या शेतातून एक वायर टपरीमध्ये आणून सोडल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.