• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाराष्ट्राचे कृषी खाते सीबीआय ईडीच्या राडावर ! वसंत मुंडे मुंबई

महाराष्ट्राचे कृषी खाते सीबीआय ईडीच्या राडावर ! वसंत मुंडे मुंबई (प्रतिनिधी)

कृषी खात्याअंतर्गत सर्वच बदल्या पदोन्नती मध्ये बोगस बियाणे खते कीटकनाशके औषधे ,जलयुक्त शिवार योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केला .महाराष्ट्र राज्यातील कृषी खात्या अंतर्गत बोगस खते बी बियाणे औषधी संदर्भातील सर्व पुरावे जोडून पंतप्रधान ,कृषी व खते औषधे मंत्री भारत सरकार नवी दिल्ली यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली असून बोगस सर्व कंपन्यांचे लायसन रद्द करण्यात यावे व शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे योग्य दराने खत बी बियाणे औषधी पुरवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. कृषी खात्याची विविध लायसन देण्यासंदर्भात नियमावली असली तरी मंत्रालयातील कृषिमंत्री व प्रधान सचिव यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्या सोबत तडजोडीने व्यवहाराचा शब्द देऊन कृषी खात्यातील गुण नियंत्रण व निविष्ठा विभागातले सोनेरी टोळीने बोगस बियाणे खते औषधी लायसन संदर्भात धुमाकूळ घातल्याची चौकशी सीबीआय व ईडी मार्फत करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी भारत सरकार कडे केली. सदोष व निकृष्ट बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची भारत सरकारच्या कायद्यात तरतूद नाही करिता कृषी खात्याचा बोगस बियाणे खते औषधी कीटकनाशके संदर्भातील केंद्र सरकारने कायदा दुरुस्त करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी सरकारकडे केली आसुन महाराष्ट्र राज्यातील कृषी मंत्रालयातील सर्वच बदल्या संदर्भात लहान मोठ्या जिल्ह्यामध्ये १ लाख ते ५ कोटी पर्यंत बदलीचा दर असल्यामुळे अधिकाऱ्यांनी स्वतःचे पैसे कंपनीमध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे कर्मचारी अधिकारी शासनाचे काम करण्याऐवजी त्यांच्या कंपनीने बनवलेल्या वस्तू खत बी बियाणे औषधी विक्री करून पैसे वसुली करणे एवढा मोठा गोरख धंदा या अधिकारी वर्गात चालू असुन मध्य प्रदेश गुजरात मधून विविध बियाणे खते औषधी खरेदी करून गुण नियंत्रण विभागातील सोनी टोळक्याला हाताशी धरून सर्व नमुने प्रयोग शाळेत अप्रमाणित निघाली तरीही आर्थिक व्यवहार करून प्रमाणित बियाणे खते औषधी आहेत असे दर्शवून लायसन वितरित केले व बोगस पुरवठा बाजार पेठेत एजंटाद्वारे चालु आहे.करीता मुद्देनिहाय पुराव्यासहित केंद्र सरकारकडे सीबीआय ईडी मार्फत महाराष्ट्र राज्यातील कृषी खात्याची चौकशी करण्याची मागणी ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली .