• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

*आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा व कोल्हापूर येथील एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या धमकीचा मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने निषेध*

*आ. झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा व कोल्हापूर येथील एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दिलेल्या धमकीचा मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने निषेध*

*पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी*

मुंबई : दैनिक आपलं महानगर व माय महानगर वेबपोर्टलचे प्रतिनिधी स्वप्निल जाधव यांना हात काढून हातात देईन, अशी धमकी देणारे वांद्रे पूर्वचे काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्या गुंडगिरीचा व कोल्हापूर येथील शिवराज्याभिषेक दिनाची बातमी प्रसारित केली म्हणून एबीपी माझाच्या विजय केसरकर यांना धमकी दिलेल्या प्रकरणाचा मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने तीव्र शब्दात निषेध केला आहे. मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन दोन्ही घटनेतील दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आलीअसून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
भाजपचे खा. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी महिला कुस्तीपटूंकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे आणि इतर महिला कार्यकर्त्यासह सोमवारी मंत्रालया नजीक राष्ट्रपिता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत होते. त्यावेळी स्वप्निल जाधव हे आ. प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया घेत होते. त्या बाईटचे थेट प्रक्षेपण सुरू होते, त्यावेळी काँग्रेसचे आमदार सिद्दीकी तेथे आले व प्रणिती शिंदेंना बोलवू लागले. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी त्यांना हात लावून बाजूला होण्याची विनंती केली. प्रणिती शिंदे यांचा बाईट घेऊन झाल्यावर संतापलेले सिद्धीकी जाधव यांना म्हणाले, तू मला ओळखतोस ना, पुन्हा असे केले तर हात काढून हातात देईन.
आ. झिशान सिद्दीकी यांची ही भाषा गुंडगिरीची असून संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवावा. तसेच काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

दुसरी घटना कोल्हापूर येथे घडलेली आहे. शिवराज्याभिषेक दिनाची बातमी एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे कोल्हापूर प्रतिनिधी विजय केसरकर यांनी प्रसारित केल्यामुळे केसकर याना मोबाईलवर अजयसिंह पाटील याने तू समोर ये तुला दावतो. आकडी येईपर्यंत मारतो अशी धमकी दिली आहे. या दोन्ही घटनेचा निषेध करत मराठी पत्रकार परीषदेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निवेदन देऊन आमदार झिशान सिद्दीकी व कोल्हापूर येथील आरोपी अमरसिंह पाटील यांनी दिलेल्या धमकीची तातडीने चौकशी करून कारवाई करावी व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा अशीही मागणी निवेदनद्वारे मराठी पत्रकार परीषदेच्या वतीने एका पत्रकाद्वारे केली आहे. या पत्रकावर मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.