• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत, तसंच शिंदे गटाने नेमलेले भरत गोगावले हे व्हीप बेकायदेशीर असल्याचंही सांगितलं आहे. याचसोबत उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार कदाचित परत आलं असतं, असं मतही सुप्रीम कोर्टाने मांडलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी ठराविक कालावधीमध्ये घ्यावा, असे निर्देशही दिले आहेत.

16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे आल्यामुळे आता राहुल नार्वेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.