• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

“आत्मा” संकल्पनेच्या माध्यमातून मौजे कन्हेरवाडी येथे “मिर्चीच्या लागवडीपासून ते मिर्ची विक्री पर्यंत” प्रशिक्षण संपन्न

◼️परळी वैजनाथ कृषी विभागाअंतर्गत आत्मा गटाचा उल्लेखनीय असा उपक्रम संपन्न

◼️”आत्मा” संकल्पनेच्या माध्यमातून मौजे कन्हेरवाडी येथे
“मिर्चीच्या लागवडीपासून ते मिर्ची विक्री पर्यंत” प्रशिक्षण संपन्न

बीड: |

भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठी सर्वसमावेशक व सहभागी धोरण राबविण्‍याबरोबरच शेतकऱ्यांना विस्‍तार सेवा पुरवून शेतकऱ्यांच्‍या गरजांवर आधारित सुयोग्‍य व आवश्‍यक मार्गदर्शनाची नितांत गरज असते. सन 1998 साली महाराष्‍ट्रात प्रायोगिक तत्‍वावर अग्रीकल्‍चर टेक्‍नॉ‍लॉजी मॅनेजमेंट एजन्‍सी (ATMA) म्‍हणजेच आत्‍माची स्‍थापना झाली. याअंतर्गत शेतकऱ्यांचे गट स्‍थापन करणे व शेतकरी उत्‍पादक कंपनी हे पाऊल उचलण्‍यात आले आहे. कृषी विकास प्रकल्‍पांतर्गत शेतकरी गटांचे बळकटीकरण करून त्‍याचे उत्‍पादन कंपन्‍यांमध्ये रूपांतर करण्‍याच्‍या दृष्टीने आणि विविध उपक्रम राबवण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणजे परळी तालुक्यातील “तालुका कृषी कार्यालय” अंतर्गत तालुका कृषी अधिकारी सोनवणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मा या संकल्पनेच्या माध्यमातून
70 शेतकरी यांचा गट तयार करून त्यांच्यामार्फत मिर्चीची लागवड केली जात आहे मिर्चीसाठी जमीन दुरुस्त करणे त्याची काळजी घेणे मिर्चीच्या लागवडीपासून ते मिर्ची विक्री पर्यंत सर्व प्रक्रियेमध्ये कृषी विभाग आत्मा गटामार्फत शेकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, पाहणी व सूचना केल्या जात असतात याच माध्यमातून साकारलेल्या अतिशय भव्य अशा आत्मा या संकल्पनेमार्फत परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडी येथे प्रसिद्ध असे शेतकरी व व्यापारी विलास( बापू ) मुंडे यांच्या शेतामध्ये जिल्हास्तरीय भव्य असे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून परळी आणि पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असलेले तज्ञ डॉक्टर सूर्यकांतजी मुंडे सर , परळी तालुक्यातील प्रसिद्ध असे शेतकरी अभ्यासू व्यक्तिमत्व पाटलोबादादा मुंडे, आंबेजोगाई येथील लक्ष्मी फर्टीलायझर्सचे डीलर प्रेमचंद मुथा,तर लाल मिर्चीची खरेदी व मार्केटिंग साठी नाशिक येथील प्रदीप किशोर पवार , प्रसिद्ध असे शेतकरी व शेतकरी मार्गदर्शक शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना करणारे अनुभवी शेतकरी ज्यांना परी आणि पंचक्रोशी मध्ये सर्व शेतकरी मित्र या नावाने ओळखतात असे वैजनाथजी कराड साहेब, उपस्थित होते यावेळी सबंध बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधव जवळपासच्या जिल्ह्यातील दुर दुरून आलेले शेतकरी मित्र मार्गदर्शक उपस्थित होते.
सदरील प्रशिक्षणामध्ये विलास बापू मुंडे यांनी मेहनतीने NS 1072 या मिर्चीचे उत्पादन केले असे विलास बापू मुंडे यांना त्यांनी लावलेल्या मिर्चीस 400 रु किलो जागेवरच भाव मिळत आहे त्यांची सर्व मिर्ची शहरातील डॉक्टर वर्गाने बुक सुद्धा केली आहे, सदरील सर्व मिर्ची लागवडी पासून ते मिर्ची काढणी पर्यंतचे प्रशिक्षण हे आत्मा अंतर्गत देण्यात आले या कार्यक्रमला कृषी विभागाचे अधिकारी एस.एस.गव्हाणे, तसेच आत्मा कर्मचारी सौ.कविता लहुदास फड BTM , व्ही.पी.मिश्रा,व्ही.एम.बिड़गर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांच्या उत्कृष्टाच्या अशा नियोजनामधूनच कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला.