• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

परळी शहरातील सर्व खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा बंधनकारक करण्यात यावी – संभाजी ब्रिगेडची लेखी निवेदनाद्वारे मागणी

परळी शहरातील सर्व खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा बंधनकारक करण्यात यावी – संभाजी ब्रिगेडची लेखी निवेदनाद्वारे मागणी

परळी (वार्ताहर)
परळी शहरातील खाजगी दवाखान्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून या खाजगी दवाखान्यामध्ये रुग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. पण या खाजगी दवाखान्यामध्ये ऑनलाइन द्वारे पेमेंट घेतले जात नसून नगदी मध्येच पेमेंट घेतले जात आहे. असे न होता ऑनलाईन पेमेंट सर्व दवाखान्यांना बंधनकारक करण्यात यावे. असे संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यकीयअधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार साहेब परळी यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान यांनी ऑनलाईन सेवा सर्व क्षेत्रांमध्ये सुरू केली आहे. आज आपण बघत असाल तर बूट पॉलिश ते भाजी विक्रेत्या पर्यंत सर्वांकडे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. सर्व मेडिकलवर सुद्धा ऑनलाईन ची सुविधा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये परळीतील खाजगी दवाखान्यांमध्ये ऑनलाईनची सुविधा का उपलब्ध नसावी ? बहुतांश दवाखाने ऑनलाईन पेमेंट द्वारे रुग्णांचे बिल का पेड करत नसावेत ? ही बाब योग्य नसून खाजगी दवाखान्यात तात्काळ ऑनलाईन पेमेंट कंपल्सरी करावे. तसेच रात्रीची व दिवसाची वेगळी फीस न घेता एकच फीस घेण्यात यावी अशी बुधवार दिनांक 29 मार्च रोजी संभाजी ब्रिगेडच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे परळी वै तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिली आहे.