• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नव्या दमाने, नव्या आयुधांसह.. मनसेच्या वर्धापन दिनाचा टीझर जारी, काय आहे त्या टीझरमध्ये ?

नव्या दमाने, नव्या आयुधांसह.. मनसेच्या वर्धापन दिनाचा टीझर जारी, काय आहे त्या टीझरमध्ये ?

ND NEWS I :

येत्या 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन असून त्या दिवशी राज ठाकरे यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्याच वर्धापन दिनाचा आता मनसेनी टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरे वर्धापनदिनी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून हा टीझर प्रसिद्ध केला. या मध्ये त्यांनी मनसेच्या काही महत्वाच्या आंदोलनाचे दृश देखील दाखवले आहेत. सोबतच राज ठाकरे यांचे भाषणाचे काही मोजके क्षण देखील घेतले आहे. यामध्ये त्यांनी ‘नव्या दमाने, नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज’ असे ब्रीद वाक्य देखील टाकले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे या वर्धापन दिनी काय नवीन घोषणा करणार याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली आहे.