• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

बीड जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ दोन रुग्णांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करा – धनंजय मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

ByND NEWS INIDIA

Apr 25, 2021

दोषींवर कडक कारवाई होणार – ना. मुंडे

  श्रीहरी कांबळे(जिल्हा ग्रा. प्रतिनिधी )

ND NEWS :बीड (दि. 25) —- : बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा ऑक्सिजन पुरवठा अज्ञात व्यक्तीने बंद केल्यामुळे येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना, आरोग्य यंत्रणा दिवसरात्र एक करून याविरोधात लढा देत आहेत. या काळात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्वाचा असून, तो वाचविण्यासाठी आम्ही सर्व जण आटोकाट प्रयत्न करत आहोत.

दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे दोन रुग्ण दगावल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमधून येत आहेत, त्याचबरोबर याप्रकरणी आपल्याकडेही काहींनी तक्रारी दिल्या असून, त्याची गंभीर दखल घेतल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

या प्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून, या गोष्टीत तथ्य असेल तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.