• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️शिक्षक-प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना संघर्ष सुरूच ठेवणार – सुर्यकांत विश्वासराव

◼️मराठवाडा शिक्षक संघाची केंद्रीय कार्यकारणीची बैठक संपन्न

◼️आगामी काळात संघटना अधिक बळकट व सक्षम बनवा : पी.एस.घाडगे

◼️शिक्षक-प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संघटना संघर्ष सुरूच ठेवणार – सुर्यकांत विश्वासराव

◼️चौदा मार्च पासूनच्या संपात संघटना पुर्ण ताकदीने सहभागी होणार – राजकुमार कदम

परळी (प्रतिनिधी)

मराठवाडा शिक्षक संघाच्या पदाधिकारी व शिक्षक कार्यकर्त्यांनी शिक्षक मतदार संघात झालेल्या पराभवाने खचून न जाता आगामी काळात संघटना अधिक बळकट व सक्षम बनवावी आसे आवाहन संघटनेचे माजी अध्यक्ष तथा मार्गदर्शक पी.एस.घाडगे यांनी केले तर संघटना शिक्षक, प्राध्यापकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीचा संघर्ष चालूच ठेवणार आसल्याचे मत संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांनी व्यक्त केले तर चौदा मार्च पासून जुन्या पेन्शनसाठी करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय संपात संघटनेचे शिलेदार मोठ्या संख्येने सहभागी होणार आसल्याचे प्रतिपादन संघटनेचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केले.


औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर व आगामी काळातील संघटनेच्या वाटचालीवर विचारविनिमय करण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीची विस्तारित स्वरूपाची बैठक संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.5) मार्च रोजी परळी येथील कॉ.वैजेनाथराव भोसले सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाली. यावेळी मराठवाड्यातून आलेल्या संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना पी.एस. घाडगे,सुर्यकांत विश्वासराव व राजकुमार कदम बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, सहसचिव माळी एन.जी.,पवार टी.जी. मार्गदर्शक तांदळे डी.जी.आदि मान्यवर उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक व बैठकीत घेण्यात येणाऱ्या विषयाचा उहापोह सरचिटणीस राजकुमार कदम यांनी केला. बैठकीत घेण्यात आलेल्या विषयावर संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपली सविस्तर भुमिका व मते मांडली. व पराभवाने खचून न जाता आगामी काळात संघटनेच्या कार्यात व आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सक्रिय सहभागी राहून शिक्षक, प्राध्यापक यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटना अधिक बळकट व सक्षम करण्याचे ठरले.बैठकीस मराठवाड्यातील आठ हि जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे आभार सहसचिव माळी एन.जी. मानले तर बैठक यशस्वी करण्यासाठी संघटनेचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य अशोक मस्कले, बंडू अघाव यांच्यासह तालुका कार्यकारणीचे पदाधिकारी एकनाथ लांडगे,राजाभाऊ नागरगोजे, राजाभाऊ राठोड आदींनी परिश्रम घेतले.