• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

◼️बीडमध्ये पंकज कुमावत यांच्या पथकाची पत्त्याच्या क्लबवर सिंघम कारवाई तब्बल 1,81,450 रुयाचा मुद्देमाल जप्त

◼️बीडमध्ये पंकज कुमावत यांच्या पथकाची पत्त्याच्या क्लबवर सिंघम कारवाई तब्बल 1,81,450 रुयाचा मुद्देमाल जप्त

◼️पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे वीस लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

◼️ND NEWS | बीड : प्रतिनिधी

बीड येथे काल दिनांक 05/03/ 2023 रोजी मा.सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की ,हॉटेल क्लासिक नगर रोड बीड येथे प्रवीण राजेंद्र पालवणकर हा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीरपणे हॉटेल क्लासिक येथे रूममध्ये काही इसमांना एकत्र बसून तिररर्ट नावाच्या जुगारावर पैसे लावून हार जित चा जुगार खेळ खेळत व खेळवीत आहे अशी माहिती मिळाल्यावरुन सदरची माहिती मा. पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब यांना कळवूनं त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश पाटील ,पोलीस ठाणे केज व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पीएसआय राजेश पाटील व पोलीस अंमलदार यांनी सदर ठिकाणी जाऊन दोन पंचांसह दि.05/03/2023 रोजि 21:15 AM वाजता छापा मारला असता क्लासिक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर हॉलमध्ये वेगवेगळे तीन ठिकाणी गोलाकार लोक बसून तिररर्ट नावाचा जुगार खेळताना मालक प्रवीण राजेंद्र पालवणकर यांच्यासह एकूण वीस लोक जागीच मिळून आले त्यांना घेऊन त्यांचे ताब्यातून नगदी 1,13,450 रुपये व मोबाईल असा एकूण 1,81,450 रुयाचा मुद्देमाल मिळून आल्याने वरील वीस लोकांविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब बांगर यांची फिर्यादवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल झाला आहे सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टॉल बाबासाहेब बांगर,बालाजी दराडे , दिलीप गित्ते ,राजीव वंजारे ,सचिन अहकारे , महादेव भैरवाल ,संजय तुले , जावळे यांनी केली.