• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात अपघातात नगरसेवक पती पप्पू इनामदार यांचा मृत्यू तर एक पोलीस कर्मचारी जखमी

ByND NEWS INIDIA

Mar 3, 2023

केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ अपघात
अपघातात नगरसेवक पती पप्पू इनामदार यांचा मृत्यू तर एक पोलीस कर्मचारी जखमी

केज-बीड रोडवर कोरेगाव जवळ कार पलटी होऊन अपघात झाला. त्या अपघातात नगरसेवक पती नगरसेवक पप्पू (आण्णा) इनामदार यांचा मृत्यू झाला. तर पोलीस जमदार सय्यद चाँद हे जखमी झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास माजी नगरसेक तथा विद्यमान नगरसेविका इनामदार यांचे पती गजमफर इनामदार उर्फ पप्पू अण्णा इनामदार
आणि केज पोलिस ठाण्यातील पोलीस जमादार सय्यद चाँद हे हे दोघे स्विफ्ट डिझायर क्र (एम एच ०४/ ई एफ ७५५७) गाडीने बीडच्या दिशेने जात असताना केज-बीड रोडवर कोरेगाव जवळील तांदळे वस्ती जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना कार रस्त्याच्या खड्ड्यात जाऊन ती पलटी झाली त्यात पप्पू आण्णा यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबत असलेले पोलीस कर्मचारी सय्यद चाँद हे जखमी झाले जखमी पोलीस कर्मचारी सय्यद चाँद यांना बीड येथील दवाखान्यात दाखल केले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी केज पोलीस ठाण्याचे पो.नि बाळासाहेब पवार,पो.उ.नि शिंदे दाखल झाले होते.