• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्ताने भीम नगर येथे 16 एप्रिल रोजी भीमयुग या क्रांतिकारी नाटकाचे आयोजन- बालासाहेब जगतकर

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्ताने भीम नगर येथे 16 एप्रिल रोजी भीमयुग या क्रांतिकारी नाटकाचे आयोजन- बालासाहेब जगतकर

ND NEWS | परळी प्रतिनिधी

क्रांतीसुर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने भीम नगर परळी येथे 16 एप्रिल रोजी क्रांतिकारी आंबेडकरवादी नाटक भीमयुग या नाटकाचा शो व भीम नगर येथील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तक्षशिला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख बालासाहेब जगतकर यांनी दिली.
याबाबत प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तक्षशिला सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने 16 एप्रिल रोजी रात्री 6 वाजता सुगंधकुटी बुद्ध विहाराच्या प्रांगणात भीमयुग या क्रांतिकारी आंबेडकरवादी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. 11 एप्रिल हा क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्मदिन तर 14 एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव तक्षशिला सेवाभावी संस्थेच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने लेखक व प्रसिद्ध नाटककार, पत्रकार रानबा गायकवाड लिखीत व डॉ.प्रा. सिद्धार्थ तायडे दिग्दर्शित भारतीय संविधानाचा यथार्थ गौरव करणारी नाट्यकृती भीमयुग या नाटकाचे व भीम नगर येथील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सत्काराचे16 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात सिनेनाट्य अभिनेते शेख गणी, निवृत्ती खंदारे, विठ्ठलराव झिलमेवाड, प्रा.मारोती कांबळे, ब्रम्हानंद काबळे, नवनाथ दाणे, महेश होनमाने, विकास वाघमारे, विद्याधर सिरसाठ, बालाजी कांबळे, सिध्देश्‍वर इंगोले, अनंत साळुंके, विनायक काळे, सिध्दांत लांडगे, सागर हनवते,वर्षा कांबळे.अंजली शेरकर.पुजा कुर्दक आदी कलावंतांचा सहभाग आहे 16 एप्रिल रोजी या क्रांतिकारी आंबेडकरवादी नाटकाचा परळी शहर व तालुक्यातील भीमसैनिकांनी लाभ घेण्याचे आवाहन तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक व वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा प्रसिद्ध प्रमुख संयोजक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.