• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

केज हाद्दीत गावठी हातभट्टी तयार करणा-या दोघांवर कारवाई

केज हाद्दीत गावठी हातभट्टी तयार करणा-या दोघांवर कारवाई

केज : पंकज कुमावत यांच्या कारवायांचे सत्र सुरूच असून या सर्व कार्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे, वाढती गुन्हेगारी अवैध धंद्यांचे प्रमाण तरुणांमधील व्यसनाधीनता या सर्व गोष्टींना जबाबदार असणारे अवैधंदे यावर लगाम लावण्याचे काम बीड जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करत आहेत,
आज दिनांक 22.02.2023 रोजी पोलीस ठाणे केज येथील पोना- 1837 दिलीप गित्ते यांना गुप्त माहिती दारामार्फत माहिती मिळाली की , पोलीस ठाणे केज हाद्दीत मौजे उमरी शिवारात गंगामाऊली साखर कारखाना परीसरात दोन ईसम नामे 01. शिवाजी बाबुराव काळे , 02. भिमा बाबुराव काळे , दोन्ही राहणार डोनगाव ता . केज जि.बीड हे गावठी हातभट्टी दारु तयार करुन त्याची चोरटी विक्री करित आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोना दिलीप गित्ते यांनी सदरची माहिती बाळासाहेब पवार : पोलीस निरीक्षक , पोलीस ठाणे केज यांना सांगुन श्री . पवार साहेब यांचे आदेशाने पोना- 1877 सोपने यांचे सह खाजगी वाहनाने सकाळी 11.30 वाजण्याचे सुमारास दोन पंचासह सदर बातमीचे रवाना झाले व 12.05 वाजण्याचे सुमारास सदर ठिकाणी अचानक छापा मारला असता पोलीस पार्टी व पंचास पाहुन दारु पिणारे लोक पळुन गेले , नमुद ठिकाणी आरोपी मिळुन आले त्यांचेकडे तयार दारुचे कॅन्ड मिळुन आले व त्याचे शेडमध्ये निळया रंगाचे 500 लिटर तीन प्लास्टीकचे ड्रम ज्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्याचे गुळ व नवसागर मिश्रीत फसफसते रसायान असे 32,900 / – रुपयाचे मुद्देमाल जागीच नष्ट केले . पोना दिलीप गित्ते , व पोना त्रिंबक सोपने यांचे फिर्यादीवरुन दोन्ही आरोपीवर वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले .
सदरची कारवाई मा . सहा . पोलीस अधिक्षक साहेब , पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली , श्री . पोलीस निरीक्षक , बाळासाहेब पवार , पोना- 1837 दिलीप गित्ते व पोना / 1877 त्रिंबक सोपने यांनी केली आहे .