• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

हिंगोलीचे आ. संतोष बांगर  आले जिल्ह्यातील जनतेसाठी धावून

ByDeepak Gitte

Apr 24, 2021

स्वतःची एफ डी मोडून रेमडीसीविर इंजेक्शन आणण्यासाठी  दिले 90 लाख रुपये

प्रतिनिधी- दिपक गित्ते

ND NEWS | दि २४- हिंगोली शिवसेना जिल्हा प्रमुख तथा  आमदार संतोष बांगर  हिंगोली जिल्ह्यासाठी दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शन आणण्यासाठी स्वतःचा एफडी मोडून नव्वद लाख रुपये एका खाजगी वितरकाला दिले कारण हिंगोली जिल्ह्यात कोरोना ने थैमान घातलेले असताना हजारो रुग्ण या इंजेक्शन साठी तडफडत असताना जिल्हा प्रशासन रकमेअभावी रेमडीसीविर हे इंजेक्शन आणण्यास हतबल झाले होते यावेळी जिल्हा प्रशासनाच्या मदतीला आमदार संतोष बांगर  धावून आले आणि कोरोना रुग्णांना वेळेवर रेमडीसीविर हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी स्वतः एफडी मोडून नव्वद लाख रुपये दिले सामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीमुळे समाधान व्यक्त करण्यात येत असताना काही राजकीय मंडळी याचेही क्रेडिट घेण्यासाठी पुढे येत आहेत म्हणून ईच्छा नसतांना देखील मला आपल्या माहिती द्यावी लागली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर  हे या काळामध्ये निस्वार्थ जनतेची सेवा करतायत तर दुसरी कडे काही राजकीय नेते मंडळी मात्र फक्त घरी बसून हे मी केलं ते मी केलं अस सांगून खोटी लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड करतायत दुसरीकडे मात्र काम करणारा नेता कुठेही जाहिरातबाजी करतांना दिसत नाहीत ते फक्त त्यांच्या सेवेत मग्न आहेत.