• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

नाशिक येथे होणाऱ्या सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : हेमंत कुलकर्णी

नाशिक येथे होणाऱ्या सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक अधिवेशनास उपस्थित रहावे : हेमंत कुलकर्णी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…

सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन येत्या 20 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आले असून या वार्षिक अधिवेशनास अधिकाधिक सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे औरंगाबाद प्रादेशिक सचिव हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्न तथा अडचणी संदर्भात विचारमंथन करून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नाशिक येथील राष्ट्रसंत श्री. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज आश्रम पंचवटी या ठिकाणी येत्या 20 फेब्रुवारी रोजी एक दिवसीय वार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्रीराम गालेवाड हे राहणार आहेत. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना संघटनात्मक कामकाज, संघटनात्मक धोरण, संघटनेचा अहवाल, ईपीएस 95 पेन्शन बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने चर्चा व माहिती तसेच सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसचा वर्षभर मोफत पास यासह विविध विषयावर सेवानिवृत्त एसटी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस सदानंद विचारे तसेच संघटनेचे संघटक सचिव पी.एन. आंबेकर यांच्यासह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे संपन्न होणाऱ्या सेवानिवृत्त एस टी कर्मचारी संघटनेच्या या राज्यस्तरीय तथा महत्त्वपूर्ण वार्षिक अधिवेशनास अधिकाधिक सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटनेचे औरंगाबाद प्रदेशाचे प्रादेशिक सचिव श्री. हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.