• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते – अनिल राठोड

संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते – अनिल राठोड

ND NEWS | परळी प्रतिनिधी

संत सेवाभाया महाराज हे दिशादर्शक, मानवतावादी, विज्ञानवादी व समतेचे पुरस्कर्ते होते त्यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत असे प्रतिपादन गोरसेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिल बळीराम राठोड यांनी हनुमान मंदिर, थर्मल कॉलनी, परळी येथे जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती महोत्सवात मार्गदर्शनात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर डी राठोड हे होते. तर मंचावर कार्यकारी अभियंता किशोर राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड, प्रभारी अधीक्षक अभियंता अरविंद येळे, धनंजय कोकाटे, सतीश मुंडे, आर एस कांबळे, एस बी उद्गार, राष्ट्रीय वीज कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे संचालक अशोक व्हावळे, भगवान साकसमुद्रे, सुरक्षा अधिकारी सचिन पवार, कुंदन राठोड, प्रदीप चव्हाण, बंडू राठोड, न.प. अग्निशामक दलाचे अधिकारी दिनेश पवार यांच्यासह अनेक उपस्थित होते. दरम्यान जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंतीनिमित्त एबीसी गेट पासून ते थर्मल कॉलनी येथील हनुमान मंदिर पर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. टीपीएस कॉलोनीतील बंजारा समाज बांधवांनी महाप्रसादाचा (भोजन) लाभ घेतला. मुख्य अभियंता पी एन भदाणे यांनी दूरध्वनी वरून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल राठोड म्हणाले कि संत सेवाभाया महाराज यांचे मूळ सिद्धांत आजही प्रासंगिक आहेत. नैसर्गिक जीवन जगा, कुणालाही किंवा कोणत्याही प्रकारे भेदभाव करू नका, खोटे बोलू नका, स्त्रियांचा सम्मान करा. अभ्यास करा, ज्ञान मिळवा, अंधश्रद्धेविरुद्ध लढाई करणारे एक बुद्धिप्रामाण्यवादि, विज्ञानवादी, मानवतावादी संत अशी त्यांची ओळख आहे. संत सेवाभाया हे दुरदृष्टी व दिशादर्शक असल्याने त्यांच्या जवळ पशुधन होते. नैसर्गिक आपत्तीचे सर्वात अगोदर आकलन हे पशूला होते. आज बंजारा समाजासमोर अनेक समस्या आहेत परंतु आपण बुद्धिजीवी असल्याने समस्यांच्या समाधानावर व उपायावर चर्चा व्हायला पाहिजे उपस्थितांचे आभार सुरेश पवार यांनी मानले