• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती

ND NEWS | धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याची माहिती मिळत आहे. या लिपिक भरती घोटाळ्यात माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

‘या प्रकरणातील शुभम मोहिते नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. या नावाची कुठलीही व्यक्ती कार्यरत नव्हती. नोकरीसाठी देण्यात आलेले आदेशपत्रही बनावट आहे. असे आदेशपत्र देण्यात येत नाही.या आदेशपत्रात बनावट सही-शिक्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. पोलीस अधिकाऱ्याशी भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार आहे असे एका माध्यमाशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.