• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनो आम्हाला माफ करा:संभाजी ब्रिगेडचे आवाहन

महाशिवरात्रीनिमित्त प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनो आम्हाला माफ करा तुम्हाला झालेल्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगीर आहोत: संभाजी ब्रिगेडचे आवाहन

 
ND NEWS | बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीनिमित्त राज्यसह देशभरातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात पण या भाविकांना कुठल्याही पद्धतीची सुविधा मिळत नसून यावर्षी पण भाविक भक्तांना खूप मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे भाविकांनो गैरसोय बद्दल आम्हाला माफ करा. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभुवैद्यनाथाच्या महाशिवरात्रीनिमित्त होत असलेल्या यात्रेत लाखो भाविक प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येत असतात पण परळी मध्ये वाहनांच्या पार्किंगची अडचण असून प्रभु वैद्यनाथाच्या मंदिराकडे जाणारा प्रमुख रस्ता राखीव ठेवला जात नाही, भक्तनिवासाची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय, प्रभू वैद्यनाथाच्या मंदिराकडे जाण्यासाठी कॉरिडॉर समितीच्या रेट्यामुळे परळी शहरात दिशादर्शक फलक लागले.परंतु ते झाकण्याच काम बॅनर प्रेमी कडून केल्या जात आहे. अनेक भाविक भक्त चुकून परळीतल्या इतर गल्लीबोळात सुद्धा जाताना आपण बघितले आहे. राजकीय नेत्यांचे व पक्षांचे बॅनर लावल्यामुळे दिशादर्शक फलक पूर्णपणे झाकून गेले आहेत. अशा परिस्थितीत भक्तांना मंदिराकडे जाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी विचारावं लागतं व काही लोक परळी शहरात अशी आढळून आले आहेत की बाहेरच्या लोकांना चुकीचा रास्ता सुद्धा दाखवतात. अशा अनेक गैरसोयी बद्दल परळीकर नागरिक म्हणून आम्ही निश्चितच भावीक भक्तांच्या प्रती दिलगिरी व माफी व्यक्त करतोय. परळी शहर हे थर्मल पावर स्टेशन मुळे होणारे प्रदूषण, राखे मुळे होणारे प्रदूषण, त्यानंतर विटभट्टी मुळे होणारे प्रदूषण यामुळे परळी शहराकडे पर्यटकांचा व भाविक भक्तांचा ओघ खूप कमी झाला आहे. पूर्वी एक महिना ते दीड महिना महाशिवरात्रीची यात्रा चालत असे अनेक कलावंत या ठिकाणी आपली कला सादर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या निमित्ताने येत असत. पण आमच्याकडेच अनेक कलाकार उदयास आल्याने आज दुर्दैवाने दीड महिन्याची महाशिवरात्रीची यात्रा चार दिवसांपर्यंत येऊन ठेपली आहे. याला कारणीभूत कोण..? याचाही विचार आम्हाला करावा लागेल. परळीकर ह्या नात्याने आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे कारण या माध्यमातून आपल्या परळीतील शेकडो लोकांना रोजगार निर्मिती होते, आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात होते ती आर्थिक उलाढाल पण इथल्या दादागिरी, गुंडागर्दीमुळे भाविक भक्तांचा ओघ परळीकडे खूप कमी झाला आहे. याला सर्वस्वी जबाबदार आपण परळीकर म्हणून आहोत म्हणून होणाऱ्या गैरसोयीबद्दल संभाजी ब्रिगेडचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.