• Sat. May 18th, 2024

ND News Maharashtra Live

ND NEWS LIVE सर्वात लवकर बातमी ... आपल्या पर्यंत

मा.नगराध्यक्ष सन्माननीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.16 मध्ये भव्य दंतरोग,मुखरोग निदान शिबीर संपन्न.

मा.नगराध्यक्ष सन्माननीय वाल्मीक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र.16 मध्ये भव्य दंतरोग,मुखरोग निदान शिबीर संपन्न.

 

 

परळी नगरपालिकेचे मा.नगरसेवक तथा गटनेते आमचे आधारस्तंभ धनंजयजी मुंडे साहेबांच्या सोबत सावली सारखे उभे असलेले व्यक्तिमत्व,साहेबाच्या संघर्षपासून विजयाचे शिल्पकार परळीत साहेबाच्या प्रत्येक कार्यक्रमची नियोजन बद्ध उभारणी व यशस्वी करून दाखवणारे गोर गरिबांचे लोकप्रिय,अर्ध्या रात्रीलाही हाकेला धावून येणारे आदरणीय वाल्मिक आण्णा कराड यांच्या वाढदिवसा निमित्त आज इस्लामपूरा बंगला गल्ली प्रभाग क्र.16 मध्ये परळी शहरातील ख्यातनाम दंतरोग तज्ञ डॉ. दिनेश लोढा साहेब,डॉ.सौ.नताशा ताई लोढा यांच्या जैन डेंटल क्लिनिक व सय्यद सिराज शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत दंत,मुखरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात 269 नागरीकांची रुग्णांची दंत आरोग्य तपासणी,प्रथमोपचार करून मोफत गोळ्या-औषध देण्यात आले.

या आरोग्य शिबिरास दंत रोपन तज्ज्ञ डॉ.दिनेश लोढा साहेब,दंत रोग तज्ज्ञ डॉ.नताशा ताई लोढा,तर प्रमुख उपस्तीथी सय्यद नासर,इशरत खान,सय्यद शफिक यांची होती.

नागरिकांन मध्ये दंत आरोग्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून घेण्यात आलेल्या मोफत दंत आरोग्य तपासणी शिबिरात दंत रोग तज्ज्ञांकडून मुख व दंत रोग, हिरड्या व त्यासबंधी आजार, दातांना लागलेली किड, दुधाचे न पडलेले दात व वेडेवाकडे दात अशा 269 दंत रोगाची तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच इस्लामपूरा बंगला गल्ली प्रभाग क्र.16 येथील तरुण, प्रोढ व ज्येष्ठ वयोगटातील 269 रुग्णांची दंत आरोग्य तपासणी करुन उपचार करण्यात आले.

यावेळी बोलताना डॉ.दिनेश लोढा म्हणाले की, लहान मुलांनी दिवसातून दोन वेळा ब्रश करावा, गोड पदार्थांचे सेवन टाळावे, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश करावा, जंक फुडचे सेवन टाळावे व दर सहा महिन्यांनी दंत रोग तज्ज्ञांकडून दंत तपासणी करुन घ्यावी,अशी माहिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद शाहेद तर शेवटी आभार अझहर खान यानी मानले.या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सय्यद लाल,जवासोद्दीन इनामदार,मोईन भाई,शेख सलीम,शेख अफझल जमील,शेख ओवेज,आदी यांनी परिश्रम घेतले.